मुंबई- राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. रात्री मुख्य सचिवांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे अधिक चिंतेचं वातावरण निर्माण झाले आगे.
मुख्य सचिवांच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची खबरदारी म्हणून नुकतीच कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात एक जण कोरोना पॉझिटीव्ह आल्याने मुख्य सचिवांनी आपली ही चाचणी करून घेतली. त्या दरम्यान त्यांचाही रिपोर्ट पाॅझिटीव्ह आला आहे.
कोरोनाची कोणतेही लक्षण नसताना रिपोर्ट पाॅझिटीव्ह आल्याने त्यांना घरीत क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोनाची साथ सतत वाढत आहेत त्यात आता अनेक नेत्यांनाही लागण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याची जास्त आवश्यकता आहे.