Sanjay Singh । आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी आज पुन्हा एकदा भाजापवर मोठा आरोप केलाय. तिहार तुरुंग प्रशासन भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटू दिले जात नसल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
अशी अमानुष वर्तणूक का? Sanjay Singh ।
संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर आरोप केले. “जेव्हा अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीने त्यांना भेटण्यासाठी अर्ज केला, तेव्हा त्यांना सांगण्यात आले की तुम्ही त्यांना समोरासमोर भेटू शकत नाही तर खिडकीतून भेटू शकता अशी अमानुष वर्तणूक का? असा सवाल त्यांनी यावेकी केला. तसेच हे अमानवी कृत्य केवळ मुख्यमंत्र्यांना अपमानित करण्यासाठी आणि परावृत्त करण्यासाठी केले गेले आहे. मी पूर्ण जबाबदारीने सांगत आहे की, भ्याड गुन्हेगारांनाही बॅरेकमध्ये भेटण्याची परवानगी आहे, पण तीन वेळा दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पत्नीला खिडकीतून भेटण्याची परवानगी आहे.” असे त्यांनी यावेळी सांगितले.
#WATCH | AAP MP Sanjay Singh says, “When the wife of Arvind Kejriwal applied to meet him, she was told that you cannot meet him face-to-face but through a window. Why such inhuman behaviour… This inhuman act has been done just to humiliate and discourage the CM. I am saying… pic.twitter.com/J0iZimH3pw
— ANI (@ANI) April 13, 2024
भाजपविरोधात अधिक आक्रमक Sanjay Singh ।
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात सुमारे सहा महिने तुरुंगात राहिल्यानंतर संजय सिंह यांची जामिनावर सुटका झाली. त्यांनी सर्वप्रथम अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्या पत्नी सीमा सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्या पत्नी पुनाज जैन यांची भेट घेतली. तिहार तुरुंगातून सुटल्यानंतर ते भाजपविरोधात अधिक आक्रमक दिसत आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते आम आदमी पार्टी आणि लोकसभा निवडणुकीच्या कामात सक्रिय झालेत. 9 एप्रिल रोजी त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचीही भेट घेतली होती.
असे आश्वासन अखिलेश यादव यांना देण्यात आले
संजय सिंह यांनी कालच यूपीचे माजी मुख्यमंत्री आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांचे आभार मानले. ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ काढलेल्या मेगा रॅलीत सहभागी होऊन हुकूमशाही सरकारच्या विरोधात आम्हाला पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले. अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराने भरलेल्या भाजपचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आम आदमी पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता तुमच्या खांद्याला खांदा लावून साथ देईल.