NCP Dispute : राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाढत्या अंतर्गत संघर्षावरून राजकीय वातावरण तापलं आहे. पक्षातील अलीकडील घडामोडींनंतर आता महायुती सरकारमधील एका वरिष्ठ मंत्र्यानेच अजित पवार गटात मोठी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. (NCP Dispute) शिवसेना नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचा दावा केला. अजितदादांच्या राष्ट्रवादीत फूट पडण्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत. तुटलेली मनं आता पुन्हा एकत्र येणं कठीण आहे,” असं वक्तव्य करत त्यांनी पक्षात मोठा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली. (NCP Dispute) गेल्या काही दिवसांपासून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात आल्याची चर्चा सुरू होती. मात्र, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ही केवळ तांत्रिक चूक असल्याचं सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तरीही, पटेल आणि तटकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आलं आहे. (NCP Dispute) राष्ट्रवादीची कमांडच त्यांच्या हातात संजय शिरसाट यांनी जय पवार यांच्या वाढत्या भूमिकेवरही भाष्य केलं. मुंबईतील एका कार्यक्रमात जय पवार यांचा राष्ट्रीय सचिव आणि खजिनदार असा उल्लेख करण्यात आल्याचं सांगत, राष्ट्रवादीची कमांडच त्यांच्या हातात देण्यात आली आहे, असा दावा त्यांनी केला. तसेच, ज्यांना पदं मिळालेली नाहीत, त्यांचं भवितव्य काय असणार हे लवकरच स्पष्ट होईल, असंही त्यांनी म्हटलं. (NCP Dispute) रोहित पवारांवरही निशाणा यावेळी शिरसाट यांनी रोहित पवार यांच्यावरही टीका केली. पार्टी फंडातून ब्युटी पार्लरसाठी खर्च होतो, हे मी पहिल्यांदाच ऐकत आहे. कदाचित रोहित पवारांनाच याची माहिती नसावी,” असा टोला त्यांनी लगावला. (NCP Dispute) दरम्यान, खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादावर चर्चा झाल्याची चर्चा असून, त्यामुळे पक्षातील मतभेद मिटणार की नवा राजकीय अध्याय सुरू होणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. (NCP Dispute)