मुंबई – भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांचं ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या लाईफटाईम या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन सिंधुदुर्गात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य म्हणून परिचीत असेलल्या अमित शाह यांच्या हस्ते झाले आहे. यावेळी शाह यांनी शिवसेनेने युती तोडल्यावरून टीका केली. याला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शायरीच्या अंदाजात ट्विट करत अमित शहांच्या टीकेवर प्रत्युत्तर उत्तर दिले आहे.
जय हिंद !!!
जय महाराष्ट्र !!! pic.twitter.com/Z5icLpoNs9— Sanjay Raut (@rautsanjay61) February 8, 2021
शिवसेनेला कोणतंही वचन दिलं नव्हतं, असं अमित शहा सांगत आहेत. यावर संजय राऊत यांनी ट्विट केले आहे की,”तुफान ज्यादा हो तो, कश्तियाँ डूब जाती है और घमंड ज्यादा हो तो, हस्तीयाँ डूब जाती है!” या शायरीला शेअर करत त्यांनी अमित शाह यांच्या जेव्हा जास्त गर्व केला जातो तेव्हा तो व्यक्तीच राहत नाही असं म्हणत टीका केली आहे. तत्पूर्वी, शिवसेनेकडून अमित शहांच्या टीकेवर प्रत्युत्तर देण्यात आले आहे.