तुफान गर्दीत संजय राऊतांचा बेळगावात रोड शो; वातावरण झाले भगवामय!

बेळगाव –  महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी बांधव कर्नाटक राज्याच्या स्थापनेचा दिवस म्हणजेच 1 नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळला जातो. कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील सीमाभागात हा  संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून सुरु झालेला हा काळा दिवस गेली 63 वर्षे पाळला जात आहे. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी मागणी येथील मराठी बांधव गेल्या कित्येक वर्षापासून करत आहे.  बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी, संतपूरसह संयुक्त महाराष्ट्र करण्यासाठी अनेक लढे झाले, अनेकांनी प्राण गमावले. परंतु हा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे.  या प्रश्नाला सोडविण्यासाठी  आता बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीकडून शुभम शेळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

त्यांचा प्रचारासाठी बेळगावमधील संयुक्त महाराष्ट्र चौकात व्यासपीठ उभारण्यात आले होते. मात्र यावेळी कानडी प्रशासनाने वीज घालवली. मात्र, या रोड शोमध्ये सामील झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी टॉच लावत रॅली सुरु ठेवली. यावेळी त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. राऊत यांच्या तडाखेबंद भाषणाने बेळगावमधील वातावरण भगवे झाले.

कार्यकर्त्यांनी डिपॉझिट, समितीने फॉर्म भरला, कोण आहेत शुभम शेळके?

शुभम शेळके यांचं वय अवघे 26 वर्ष आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने शुभम विक्रांत शेळके यांचा फॉर्म भरला होता. समिती कार्यकर्त्यांनी डिपॉझिट भरले. सर्वसामान्य कुटुंबातील असणारे शुभम शेळके यांचा लहानपणापासूनच सीमाप्रश्न जवळचा संबंध होता.

शुभम शेळके यांचं शिक्षण sslc झालं आहे. लहानपणापासून त्यांनी आंदोलन जवळून पाहिले आहे. सीमाप्रश्नाची झालेली वाताहतीमुळे त्यांनी युवासेनेच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली. मागील पाच वर्षात शैक्षणिक उपक्रम, मराठी शाळांना मदत यासोबत सीमा आंदोलनात भाग घेतला.

युवा समितीने सीमा भागातील युवकांना एकत्रित करून, या चळवळींमध्ये युवकांना प्राधान्य दिले. त्यामुळेच आज शुभम शेळके यांना तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.