मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईत एक मोठी सभा घेऊन विविध विषयांवर भाष्य केले होते. त्यांच्या या सभेची मोठी चर्चा झाली आणि सर्वच पक्षातील नेत्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणावर जोरदार टीका केली होती. यानंतर राज ठाकरे यांनी ठाणे येथील सभेत मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत पुन्हा एकदा वक्तव्य केले आहे. राज ठाकरे म्हणाले, मशिदींच्या भोंग्यासंबंधी सर्व मशिदींना 3 मे पर्यंत मुदत देतो, या नंतर जर कोणी भोंगे काढले नाहीत तर देशभर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्यात येणार, असा इशारा ठाकरे यांनी दिला. राज ठाकरेंच्या या भूमिकेवरुन अनेक प्रतिक्रिया येत आहे.
Mumbai:Poster that reads “Whom did you call Owaisi? Sanjay Raut shut down your loudspeaker,whole Maharashtra facing problem due to it or else we’ll shut down your loudspeaker in MNS style” seen outside Saamana Office
Raut reportedly called Raj Thackeray ‘Maharashtra ka Owaisi’ pic.twitter.com/qMurBPmC0Y
— ANI (@ANI) April 16, 2022
तर आता या वादावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते, युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी राज ठाकरे हे मराठी ओवेसी असल्याचं म्हटलं आहे. यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या वादावर बोलताना आधी भाजपवर हल्लाबोल केला तसेच राज ठाकरे हे भाजपसाठी महाराष्ट्राचे ओवेसी असल्याचे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केलीय.
त्यांच्या या टीकेनंतर सामना वृत्तपत्राच्या कार्यालयाबाहेर पोस्टर लावले गेले या पोस्टरमधून शिवसेनेवर टीका केली आहे. आता या पोस्टरवरून राजकारण चांगलेच तापले असून या पोस्टरमध्ये लिहिले,’तुम्ही ओवेसी कोणाला बोलला? संजय राऊत, आधी तुम्ही तुमचा लाऊडस्पीकर बंद करा. मिळालेल्या माहितीनुसार, हे पोस्टर मनसेने लावले आहे की दुसरे कोणी? याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. मात्र या पोस्टरमुळे नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.