New Parliament House । ram mandir । sanjay raut: नवी दिल्लीमध्ये बुधवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. या पावसामुळे नवीन बांधण्यात आलेली संसद भवन पाण्यात गेल्याचे पाहायला मिळाले.
संसदेच्या मकरद्वारजवळही पाणी साचले आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अशात आता नवीन संसद भवनाच्या आतही पाणी गळत असल्याचे व्हिडिओ इंडिया आघाडीच्या नेत्यांनी शेअर केले आहे.
तामिळनाडूच्या विरुधुनगर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी पोस्ट केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Paper leakage outside,
water leakage inside. The recent water leakage in the Parliament lobby used by the President highlights urgent weather resilience issues in the new building, just a year after completion.
Moving Adjournment motion on this issue in Loksabha. #Parliament pic.twitter.com/kNFJ9Ld21d— Manickam Tagore .B🇮🇳மாணிக்கம் தாகூர்.ப (@manickamtagore) August 1, 2024
शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये संसदेच्या नवीन इमारतीत पाणी शिरताना दिसत आहे. छतावरून पाणी गळत असून, पडणारे पाणी पसरू नये म्हणून फरशीवर बादल्या ठेवण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.
दरम्यान, हेच चित्र काही दिवसांपूर्वी अयोध्येतील राम मंदिरमध्ये दिसले होते. पहिल्या पावसात मंदिराच्या छतामधून गळती झाली होती. यावेळी मंदिराच्या गर्भगृहाचा आतील भागही पाण्याने भरला होता. ठिकठिकाणी पाणी साचले होते. मात्र, आता याच दोन्ही मुद्यांवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केले.
संजय राऊत म्हणाले की, “नवी संसद आणि अयोध्येतील राम मंदिराच्या कामाला एक वर्षच पूर्ण झाले आहे. तरीही याठिकाणी पावसाळ्यात पाणी गळत आहे. त्यामुळे या दोन्ही कामांसाठी भाजप सरकारने ठेकेदरांना किती पैसे दिले, या सगळ्यातून कमिशन कोणाला मिळालं? याची चौकशी झाली पाहिजे.
राम मंदिराचं काम लार्सन अँड टुब्रो आणि दिल्लीतील नव्या संसदेचं काम टाटांनी केले. पण या कामाची इतर कंत्राटं कोणाला देण्यात आली होती, याची चौकशी झाली पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.