संजय राऊत सहकुटुंब शरद पवारांच्या भेटीला

मुंबई – महविकास आघाडीचे सरकार सध्या अडचणीत साडपले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. यावेळी राऊत यांच्यासह पत्नी आणि मुलगीही उपस्थित होती. राऊतांनी सहकुटुंब पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली होती.  यानंतर वर्षा राऊत यांची दोनदा चौकशीही करण्यात आली होती.  या पार्श्वभूमीवर अचानक संजय राऊतांनी सहकुटुंब शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान,  या प्रकरणातील आणखी एक आरोपी प्रविण राऊत यांच्या पत्नीशी 50 लाख रुपयांचे व्यवहार झाले आहेत. वर्षा राऊत यांनी मालमत्ता खरेदीसाठी हे कर्ज घेतले होते. यासंदर्भात चौकशी करण्यात आली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.