मुंबई: विधानसभा निकालापासून शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी पक्षाची बाजू लावून धरणारे शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर सोमवारी रात्री अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होत असून त्यांना उद्या, बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
संजय राऊत यांच्या छातीत दुखू लागल्याने सोमवारी लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्या वैद्यकिय तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांत दोन ब्लॉक असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर तातडीने अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना बुधवारी रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. अँजिओप्लास्टी झाल्यानंतर त्यांनी रूग्णालयातनूच काम करायला सुरुवात केली.