मुंबई – शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या व्हिडिओचा वाद काही केल्या थांबताना दिसत नाही. यामुळे शीतल म्हात्रे यांच्यासह आमदार प्रकाश सुर्वे हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहेत. यावर आता ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळते. तुम्ही मुका घ्या नाही तर मिठ्या मारा. आम्हाला कशासाठी टार्गेट करता ? आमच्या कार्यकर्त्यांना का अटक केली जात आहे? असा जळजळीत सवाल ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
तुम्ही मुके घेतले.. तुम्हीच निस्तरा त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही असं म्हणत सार्वजनिक ठिकाणी मुके घेणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही असा मिश्किल टोमणा देखील राऊत यांनी यावेळी लगावला आहे. तसेच सुर्वे यांच्या मुलानेच तो व्हिडीओ शूट केला असल्याने त्याला अद्याप अटक का झाली नाही असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.
तो व्हिडीओ खरा की खोटा हे आधी समोर येऊ द्या.. मॉर्फिंगचा विषय नंतर येईल असं देखील संजय राऊत यावेळी म्हणालेत. तसेच आज दादा कोंडके हवे होते. त्यांचा सिनेमा मुका घ्या मुका गाजला होता असं म्हणत संजय राऊत यांनी जोरदार टोजेबाजी केली.
या प्रकरणात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना का अटक करता? त्यांचा संबंध काय? हा सत्तेचा आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर आहे. तुम्ही मुके घेतले तुम्ही निस्तरा आमच्यावर बोट दाखवू नका नाहीतर शाहिस्ते खानाची बोट तुटली हे लक्षात घ्या असा इशाराचं यावेळी संजय राऊत यांनी दिला.