मुंबई – शरद पवार यांनी युपीएचे अध्यक्ष व्हावे अशी जी सुचना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली आहे त्यावर महसुल मंत्री व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राऊत यांना सावधगीरीचा इशारा दिला आहे. राजकीय प्रतिक्रीया देताना संजय राऊत यांनी काळजी घ्यावी असे त्यांनी म्हटले आहे.
आज येथे पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले की सोनिया गांधी या युपीएच्या अध्यक्षा आहेत आणि त्याच या पदावर बराच काळ राहणार आहेत. प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनाहीं संजय राऊत यांची ही प्रतिक्रीया आवडली नव्हती. संजय राऊत हे पवारांचे प्रतिनिधी किंवा प्रवक्ते आहेत काय अशी विचारणा पटोले यांनी केली होती. शिवसेना हा पक्ष युपीएचा सदस्यही नसताना त्यांनी त्यांच्या कक्षेच्या बाहेरच्या प्रतिक्रीया देऊ नयेत असे कॉंग्रेस नेत्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना स्पष्ट केले आहे.