मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडी कस्टडीत असलेले राऊत यांचे जामिनासाठी प्रयत्न सुरु होते मात्र न्यायालयाने राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडीने संजय राऊत यांना अटक केली होती.
#UPDATE | Mumbai: Shiv Sena MP Sanjay Raut sent to judicial custody till 22nd August in connection with Patra Chawl land case https://t.co/J36zzqgYi4
— ANI (@ANI) August 8, 2022
संजय राऊत यांची ईडी कस्टडी आज संपली. त्यानंतर राऊतांना न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी न्यायालायने २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. राऊत यांच्या वकिलांनी यावेळी राऊतांना हवेशीर खोली,औषधे आणि घरचे जेवण देण्याची परवानगी मागितली. त्यावर न्यायालयाने जेल प्रशासनाशी याबाबत बोलून घेण्यास सांगितले. त्यामुळे आता राऊत यांचा पुढचा मुक्काम हा आर्थड रोड जेलमध्ये असणार आहे.