Sanjay Raut : महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतरही अद्याप मुंबई महापौर पदाची निवड कधी होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दुसरीकडे, शिंदे सेनेने मुंबईमध्ये महापौर पदावर दावा केला आहे. तर भाजप संख्याबळानुसार ही संधी सोडायला तयार नाही. त्यावरून खासदार संजय राऊतांनी शिंदे सेनेवर जहरी टीका केली. तसेच मुंबईचा महापौर हा भाजपचाच होईल आणि शिंदेसेनेकडून निमुटपणे त्याला पाठिंबा दिला जाईल, असा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे तुम्हाला लवकरच आमच्या सोबत दिसतील. आमच्या सोबत येण्याची त्यांची प्रोसेस सुरू झाली आहे, असा दावा उद्योगमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी केला होता. यावर प्रत्युत्तर देत संजय राऊत म्हणाले, “अंबादास दानवे हे कडवट शिवसैनिक आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पक्षात आहेत. त्यांनी तीन-चार पक्ष बदलले नाहीत. ते आमचे सहकारी आहेत. या दाव्यांना अर्थ नाही. स्वतः उदय सामंत एका मोठ्या गटासह भाजपमध्ये जाणार आहेत. दावोसमध्ये काय चर्चा झाली हे तुम्हाला माहिती आहे का?” असा दावा त्यांनी केला. अलीकडेच मुख्यमंत्री फडणवीस दावोसमध्ये गेले होते, यावेळी त्यांच्यासोबत उदय सामंत देखील होते. Sayaji Shinde : “कुठलाही रंंग कोणाच्या…”; सहर शेख यांच्या वादग्रस्त विधानानंतर सयाजी शिंदेंची संतप्त प्रतिक्रिया तसेच माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण देण्याला विरोध करत संजय राऊत यांनी भाजपसह शिंदे सेनेला देखील खडेबोल सुनावले आहे. “शिंदे गटाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह हे वंदनीय आहेत. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला पण शिंदे सेनेकडून निषेधाचा एक शब्द नाही. शिंदे सेनेला बाळासाहेब वंदनीय नाहीत. शिंदे शिवसेना ही भाजपचं अंगवस्त्र आहे. किती दिवस रुसून बसणार? फारतर एखादी साडीचोळी पदरात पाडून घेतील,” असा टोलाही राऊतांनी लगावला. हेही वाचा: Health Tips: उठताच चक्कर येणे म्हणजे काय? जाणून घ्या कारणे आणि उपाय