‘मोदींनी कलामांना राष्ट्रपती केलं होतं’, चंद्रकांत पाटलांच्या दाव्याचा राऊतांकडून समाचार

पुणे – अतिरेकी कारवायांसाठी स्लीपर सेलमध्ये काम करणाऱ्या मुस्लिमांना विरोध नाही करायचा का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला होता. तसेच सगळ्या मुस्लीमांना विरोध करण्याचा प्रश्नच नाही. मोदींना सर्वप्रकारे मुस्लीमांना प्राधान्य दिलं. मोदींनी दिवंगत अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केल्याचा दावा पाटील यांनी केला होता. यावर आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येत आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी खास शैलीत चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

राऊत म्हणाले,अब्दुल कलाम हा अटल बिहारी वाजपेयींचा मास्टरस्ट्रोक होता. मोदी तेव्हा राष्ट्रीय राजकारणात नव्हते. काही लोकं प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेतात आणि त्यांचा विनोद होतो. असा टोला राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला. तसेच इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली होती. आताची आणीबाणी ही छुप्या पद्धतीने आहे,तेव्हा फक्त राष्ट्रपतींच्या सहीने लावली होती. त्या काळातले सेलिब्रेटी कमिटेड होते, स्वातंत्र्य लढा, सामाजिक चळवळीशी संबंध होता, असं म्हणत राऊत यांनी सेलिब्रेटींनी देखील सुनावले. संजय राऊत सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी त्यांनी पत्रकारांशी संवबाद साधला.

 

राऊत यांनी करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर भाष्य केले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. मुख्यमंत्री दूरदृष्टीचे नेते आहे. भविष्यात करोना संकट वाढू शकेल याचा त्यांनी अभ्यास केला होता. म्हणून काही गोष्टी उघडू नये असा त्यांचा आग्रह होता. विरोधकांनी धार्मिक राजकारण केल्यावर काहीसे उघडण्यात आल्याचे राऊत यांनी म्हटले.

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.