‘संजय राऊत’ लिलावती रुग्णालयात दाखल

मुंबई – शिवसेना खासदार ‘संजय राऊत’ यांना आज लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून छातीत वेदना होत असल्याने आज संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. डॉ.जयललिता पारकर हे संजय राऊत यांच्यावर उपचार करणार असून, पुढचे दोन दिवस राऊत रुग्णालयात असणार आहे.

दरम्यान, यावेळी राऊत यांच्यावर अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची जबाबदारी तीन नेत्यांवर सोपवली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे, अनिल परब, सुभाष देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (७ वाजता) शिवसेनेला सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.