Sanjay Raut – मनसे प्रमुख राज ठाकरे हे ठाकरे असले तरी मी देखील राऊत आहे, माझे बरेच आयुष्य बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत गेले आहे. बाळासाहेबांनीच घडवलेला मी राऊत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
या माध्यमातून संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. त्यांनी मला शिकवण्याची आवश्यकता नसल्यााचे राऊत यांनी म्हटले आहे. ज्याला जी भाषा समजते, ती भाषा मी वापरत असल्याचे राऊत त्यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे बोलत असलेली स्क्रिप्ट ही देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राज ठाकरेंवर ईडीची टांगती तलवार असल्याने त्यांना हे बोलावे लागत असल्याचे देखील राऊत म्हणाले. भाजपच्या नादी लागलेला अजून काय बोलणार? अशा शब्दात त्यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला.
राज ठाकरे ज्या ठिकाणी बोलले तिथे गुंडांच्या माध्यमातून निवडणूक लढवली जात असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. अशा गुंडांना वर्षा बंगल्यावरुन सूचना येत असल्याा आरोप देखील संजय राऊत यांनी केला. या माध्यमातून सत्यनारायण चौधरी यांनी यांच्यावर देखील संजय राऊत यांनी टीका केली.
सत्ताधारी पक्षाचे नेते गुंडांच्या मदतीने निवडणुका लढवत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. प्रत्येक मतदारसंघासाठी स्वतंत्र गुंडांची नियुक्ती केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
गुंडांना वापरून शिंदेंचे आणि भाजपचे लोक निवडणुका लढवत असतील तर जे घडणार आहे त्याची सर्व जबाबदारी पोलिसांवर असेल, अशा शब्दात राऊत त्यांनी टीका केली. शिवसेनेतील सहकार्यांना मोदी यांनी वेगळे केले.
राष्ट्रवादीतल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना मोदी यांनी वेगळे केले, त्यामुळे आपण काय बोलत आहोत हे आधी मोदी आणि शहा यांनी समजून घ्यावे असे शब्दात, एक रहेंगे तो सेफ रहेंगे या मोदी यांच्या नाऱ्याचा राऊत यांनी समचार घेतला.
अशाप्रकारे बोलण्याची वेळ पंतप्रधानांवर का यावी? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. आम्ही महाराष्ट्रात नक्कीच सेफ आहोत मोदी-शहा आल्यानंतरच आम्ही अनसेफ होत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.