मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या आरोपावर हा गंभीर गुन्हा आहे, असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे इभ्रत राखायची असेल तर मुंडे यांचा राजीनामा घ्यावा. अशी मागणी सध्या विरोधक करत आहे. विरोधकांकडून मविआवर निशाणा साधला जात असून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरही टीका केली जात आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा : ऍड. आंबेडकर
संजय राऊत सहकुटुंब शरद पवारांच्या भेटीला
दरम्यान, संजय राऊत म्हणाले,’राज्यात काही झालं तरी विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी केली जाते.मग दिल्लीत जे कृषी आंदोलन सुरु आहे. त्यामुळे तर आम्ही रोज पंतप्रधानांचा राजीनामा मागू.” असं म्हणत विरोधकांच्या राजीनाम्याच्या मागणीवर संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा