पंतप्रधान मोदींचे विमान महाराष्ट्राकडेही वळेल, “मोदी दिलदार आहेत, महाराष्ट्राला 1500 कोटी देतील

मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व गोवा या राज्यांना जोरदार फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात मधील चक्रीवादळाची पाहणी करुन नुकसान भरपाईसाठी गुजरातला 1 हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. यासंदर्भात शिवसेना खासदार संंजय राऊत यांनी नरेंद्र मोदी दिलदार असून ते महाराष्ट्राला 1500 कोटी देतील असा टोला लगावला आहे.

संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात मधील चक्रीवादळाची पाहणी करुन तात्काळ मदत केली. मोदींचं सगळ्या देशाकडे लक्ष असतं. त्यामुळे ते महाराष्ट्राला नक्की मदत करतील व तौक्ते चक्रीवादळातील नुकसान भरपाईसाठी महाराष्ट्र राज्याला 1500 कोटींची मदत देतील. मोदींचे विमान महाराष्ट्राकडेही कधीतरी वळेल, अशी आशा मी करतो.

तौक्ते वादळामुळे गुजरात आणि दीव दमण मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भागाची हवाई पाहणी केली व गुजरातला १ हजार कोटी रुपयांची तात्काळ मदत जाहीर केली आहे. गुजरातच्या पाहणी नंतर पंतप्रधान हे एकट्या गुजरातचेच आहेत का ? असा सवाल विरोधकांनी विचारण्यास सुरुवात केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.