पाबळ कोविड सेंटरमधील असुविधेमुळं संजय पाचंगे आक्रमक; दिला उपोषणाचा इशारा

पाबळ(प्रतिनिधी) – पाबळ कोविड सेंटरमधील असुविधांमुळे रुग्णांचे हाल होत आहे. केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे होत असल्याचा दावा भाजपचे जिल्हा उद्योग आघाडीचे शिरुर तालुका अध्यक्ष संजय पाचंगे यांनी केली आहे. तसेच पुढील पाच दिवसांत पाबळ कोविड सेंटरमधील स्थिती सुधारली नाही, तर आपण उपोषण करणार असल्याचा इशारा पाचंगे यांनी दिला आहे.

संजय पाचंगे यांनी आज येथील कोविड सेंटरला भेट देऊन येथील सेवा सुविधांची पाहणी करून सखोल माहिती घेतली. येथील असुविधा पाहताच त्यांनी तहसीलदार लैला शेख व आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.  मात्र अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. यावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त करून उपोषणाचा इशारा दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.