संजय लीला भंसालीला आलियाने दाखविली “कलंक’ची झलक

मल्टीस्टारर “कलंक’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. जेव्हा चित्रपटाचा पहिला टिझर रिलीज झाला, तेव्हा याची तुलना चित्रपट निर्माता संजय लीला भंसाली यांच्या “राम लीला’, “बाजीराव मस्तानी’ आणि “पद्मावत’ यासारख्या चित्रपटांशी करण्यात येत आहे.

भंसाली यांचे चित्रपट मोठ-मोठे सेट, ट्रडिशनल कॉस्ट्‌यूम्ससाठी ओखळली जातात. यामुळे त्यांचा प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. काही दिवसांपूर्वीच आलियाला भंसाली यांच्याबाबत विचारले असता ती म्हणाली, मीच नव्हे तर “कलंक’चे डायरेक्‍टर अभिषेक वर्मन हेही संजय यांचे चाहते आहेत.

आलियाच्या मते, “कलंक’ चित्रपट भंसाली यांच्या टाइपचा आहे. पण ती दुनिया त्यांच्याशिवाय अन्य कोणीही दाखवू शकत नाही. आलिया म्हणाली, जेव्हा भंसाली यांना मी “कलंक’चा टीझर दाखविला. तो त्यांना खूपच आवडला. या टिझरबाबत त्यांची चांगली प्रतिक्रियाही दिली.

दरम्यान, आलिया पहिल्यांदाच संजय लीला भंसाली यांच्यासोबत आगामी “इंशाअल्लाह’ चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत चुलबुल पांडे अर्थात सलमान खान झळकणार आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी आलिया खुपच उत्सुक आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.