बॉलीवूडमध्ये गतवर्षी प्रदर्शित झालेला साउथचा सुपरस्टार यशचा ‘केजीएफ : चॅप्टर-1′ चित्रपटाला चांगले यश मिळाले होते. या चित्रपटाने यशाची नवनवे शिखर पार करत अनेक विक्रमही प्रस्थापित केले होते. त्यानंतर चित्रपटाच्या सिक्वलबाबत चाहत्यांना उत्सुकता लागलेली आहे. या चित्रपटातील मुख्य अधीराच्या भूमिकेचे पहिले पोस्टर प्रदर्शित केले आहे. अधीराच्या भूमिकेत संजय दत्त झळकणार आहे.
BIG ANNOUNCEMENT… Sanjay Dutt as #Adheera in #KGFChapter2… #SanjayDuttAsAdheera pic.twitter.com/VJ1lKifmla
— taran adarsh (@taran_adarsh) July 29, 2019
‘केजीएफ : चॅप्टर-1’मध्ये अधीराची भूमिका चर्चेत होती. संजय दत्तच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त आज अधीराच्या लूकमधील पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘केजीएफ : चॅप्टर-२′मध्ये संजय दत्त व्हिलनची भूमिका निभावणार आहेत.
दरम्यान, चित्रपट पुढील वर्षी २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच चित्रपटाच्या सिक्वलमध्येही श्रीनिधि शेट्टी मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.