संजय दत्त उद्यापासून प्रचाराच्या मैदानात

मुंबई – उत्तर मध्य मुंबई मतदारासंघात कॉंग्रेसच्या प्रिया दत्तसाठी त्यांचा भाऊ अभिनेता संजय दत्त प्रचाराच्या मैदानात उतरणार आहे.

संजय दत्त सहा विधानसभा मतदारसंघात प्रिया दत्तसाठी रोड शो करणार आहे. सोमवारपासून संजय दत्त यांच्या रोड शोला सुरुवात करणार आहे. भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या विरोधात प्रिया दत्त टक्‍कर देणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.