नवी दिल्ली – आयपीएस अधिकारी संजय आरोरा यांची दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आरोरा हे विद्यमान आयुक्त राकेश अस्थाना यांच्याकडून पदभार स्विकारतील. अरोरा सध्या आयटीबीपीचे प्रमुख असून 1988 च्या तमिळनाडू बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी राजस्थान येथून इलेक्ट्रीक आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले आहे.
भारतीय पोलीस सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांनी तमिळनाडून विविध पदांवर काम केले आहे. चंदन तस्कर वीरप्पन याच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या विशेष कृती पथकाचे अधिक्षक म्हणूनही आरोरा यांनी काम पाहिले होते. याच पथकाला ऐतिहासिक यश मिळाले होते. या यशासाठी आरोरा यांचा तेव्हा मुख्यमंत्री वीरता पुरस्काराने गौरव करण्यात आला होता.