सुशांतसिंह राजपूतच्या अखेरच्या “दिल बेचारा’ चित्रपटातील अभिनेत्री संजना सांघीने मुंबईला “खुदा हाफिज’ म्हटले आहे. संजनाची नुकतीच वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करण्यात आली. यानंतर बुधवारी संजनाने इन्स्टाग्रामवर माहिती दिली की ती मुंबई सोडून परत दिल्लीला जात आहे. परंतु या पोस्टच्या शेवटी, तिने असे काही लिहिले, ज्यामुळे ती पुन्हा मुंबईला येऊ इच्छित नाही, अशी शंका निर्माण होते.
संजनाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आपला एक फोटो शेअर करताना लिहिले की, मी मुंबई विमानतळावर असून दिल्लीत परतत आहे. “खुदा हाफिज, मुंबई’. 4 महिन्यांनंतर आपले दर्शन झाले. मी पुन्हा दिल्लीला जात आहे. यावेळी मला मुंबईतील रस्ते थोडे वेगळे वाटले, ते निर्जन झाले होते, कदाचित माझ्या अंत:करणातील दु:खाचा दृष्टिकोन असेल किंवा कदाचित याक्षणी तुम्हालाही थोडेसे दुःख आहे. पुन्हा भेटू लवकरच किंवा कदाचित नाही.
दरम्यान, पोलीस चौकशीनंतर बाहेर आल्यानंतर संजना अस्वस्थ दिसत होती. प्रदीर्घ चौकशीनंतर ती तणावग्रस्त असल्याचे दिसून आले. मुकेश छाबडा दिग्दर्शित सुशांत आणि संजनाचा “डिज्नी-हॉटस्टार’ हा चित्रपट 24 जुलैला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. पण, संजनाची इन्स्टाग्रामवरील पोस्टवरून सध्याच्या परिस्थितीत ती दु:खी आणि नाराज असल्याचे दिसत आहे.