मुंबई, दि. 1 -सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी त्याची मैत्रीण व सहकलाकार संजना सांघी हिची बुधवारी तब्बल 9 तास चौकशी केली. आजपर्यंत याप्रकरणी पोलिसांनी 27 जणांचे जबाब नोंदवले आहेत.
सुशांतचा अखेरचा चित्रपट “दील बेचारा’मध्ये संजना सहकलाकार आहे. त्यावेळी तीने सुशांतने गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. मात्र, संजनाने हे आरोप फेटाळले आहेत. माझ्या नावाने हे आरोप करण्यात आले त्यावेळी मी अमेरिकेत होते. कोणीतरी माझ्या नावाने फेक अकाउंट काढून हे आरोप केल्याचेही तीने पोलिसांना सांगितले.
संजनाने आरोप केल्यामुळेच सुशांत तणावाखाली आला व त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचा संशय काही जणांनी पोलिसांकडे व्यक्त केला होता. त्यामुळेच तिची चौकशी करण्यात आली.