Corona Care | प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पुण्यातील रिक्षा संघटनेकडून दररोज 2500 रिक्षा ‘सॅनिटाईज’

पुणे –  आम आदमी रिक्षा संघटनेच्या वतीने शहरातील विविध भागात दररोज 2 ते 2500 हजार रिक्षांवर सॅनीटायजर होत आहे. पण हा सॅनीटायजर पूणे महापालिका प्रशासन करत नसून आम आदमी रीक्षाचालक संघटना स्व खर्चाने करत आहे. तसेच रिक्षाचालकांना मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सचा पालन करण्यासाठी वारंवार सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे ह्या कामात शासनाची कूठलीही मदत न घेता हे उपक्रम राबविलेला आहे.प्रवाशांना सुरक्षित प्रवास मिळावा व कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हा प्रयत्न संघटनेमार्फत करण्यात आला आहे.सरकारने लॉकडाऊन करू नये केल्यास रिक्षाचालकांना 5000 रूपये अनुदान आणि स्वस्त धान्य पुरवठा करावा.यावेळी अध्यक्ष असगर बेग,आसिफ मोमीन,सुनिल फतपुरे,किरण कांबळे,अशोक शिंदे,मनोज फुलावरे,चाँद शेख,अनिल धुमाळ,गणेश ढमाले,अनिल बगाडे उपस्थित होते आनंद अंकूश यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.