टाकळी हाजी – राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सुचनेनुसार भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने शिरूर आंबेगाव मतदार संघामधील टाकळी हाजी, कवठे येमाई, केंदूर, पाबळ येथील आरोग्य केंद्रांना हॅन्ड सॅनिटायझर व मास्क देण्यात आले.
माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव पानगे, टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप बिक्कड व आरोग्य सेवक भरत सोदक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या वेळेस जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे, घोडगंगा साखर कारखान्यांचे संचालक राजेंद्र गावडे उपस्थित होते.