बारामती – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शहरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये स्वच्छता अभियानाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत संपूर्ण प्रभागाची स्वच्छता केली जाणार आहे. नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्वच्छ सुंदर हरित बारामतीअभिप्रेत आहे. त्यानुषंगाने शहरात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते येथील स्थानिक नगरसेवक सत्यव्रत काळे यांनी प्रभाग क्रमांक 13 मध्ये स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत नगरपरिषदचा आरोग्य विभाग तसेच नागरिकांच्या सहभागातून प्रभागाची स्वच्छता होत आहे.
अभियानाच्या शुभारंभास उपनगराध्यक्षा तरन्नुम सय्यद ,ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, मुख्यधिकारी किरणराज यादव, नगरसेवक नवनाथ बल्लाळ तसेच अल्ताफ सय्यद ,सिद्धनाथ भोकरे ,बन्सीलाल मुथा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
स्थानिक कार्यकर्ते रफिक शेख, अमीर बागवान, शफिक इनामदार, दीपक शिंदे, सोनू शिंदे, पिंटू मुसळे, नागेश कासार, विष्णू पवार व स्थानिक नगरसेवक सत्यव्रत अर्जुनराव काळे यांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आरोग्य विभागाचे प्रमुख राजेंद्र सोनवणे व त्यांच्या टीमचे मोलाचे सहकार्य लाभले. काळे नगर, बुरुड गल्ली, चिमणशहा मळा हा परिसर स्वच्छ करण्यात आला.
कोरोना चा प्रादुर्भाव तसेच इतर विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रभाग क्रमांक 13 मध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अभिप्रेत असलेला स्वच्छता मोहीम उपक्रम उपक्रम हाती घेतला आहे. नगर परिषद आरोग्य विभाग तसेच नागरिकांचा प्रतिसाद मिळाल्याने प्रभाग स्वच्छ होत आहे.
– सत्यव्रत काळे, नगरसेवक बारामती नगरपरिषद