पावसाळ्यापूर्वी वॉर्ड क्र. 6 मध्ये स्वच्छता अभियान

सातारा- येत्या दोन दिवसात मान्सून राज्यात सक्रिय होणार असून त्या पार्श्‍वभूमीवर पावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या रोगांना रोखण्यासाठी वॉर्ड क्र. 6 मध्ये स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. पावसाळ्यात येणाऱ्या डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्ल्यू या रोगांना रोखण्यासाएठी स्वच्छता महत्वाची असते. त्यामुळे नागरिकांनी सभोवतालच्या झाडे झुडपे, नाले स्वच्छ करुन सर्वांना सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी केले.

नगरपालिकेने उपलब्ध केलेल्या घंटागाडीमार्फत ओला कचरा व सुका कचरा घंटागाडीमध्ये टाकावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. वॉर्ड क्रमांक 6 मध्ये स्वच्छतेसाठी नवनवीन उपक्रम राबवले जातात. लहान मुलांच्या रॅलीद्वारे स्वच्छता मोहिम राबवून स्वच्छता दूत रफिक शेख हे लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देत आहेत.

यावेळी नगरसेविका सविता फाळके, नगरपालिकेचे अभियंता प्रदीप साबळे, उमर शेख, वैभव जाधव, राजू जाधव, नगरपालिकेचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

सातारा ः वॉर्ड क्रमांक 6 मध्ये स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले नगरपालिकेचे कर्मचारी.
फोटो – अभियान

Leave A Reply

Your email address will not be published.