वाघोली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा समर्पण सप्ताह अंतर्गत वाघोली येथे स्वच्छता अभियान, वृक्ष रोपण आदि विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आले.
वाघोली (ता. हवेली) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा समर्पण सप्ताह अंतर्गत स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे आयोजन हवेली तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अनिल सातव व भारतीय जनता पार्टी वाघोली शहर अध्यक्ष केतन जाधव यांनी केले होते. सेवा समर्पण सप्ताह अंतर्गत वाघोलीतील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर परिसर, भैरवनाथ तलाव घाट परिसरामध्ये स्वच्छ्ता करण्यात आली.
यावेळी पुणे जिल्हा भाजप उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील, भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सदस्य गणेश बापू कुटे, भाजप पुणे जिल्हा युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप आबा सातव, भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष तथा शिरूर बेट मंडल प्रभारी गणेश सातव, क्रीडा आघाडी हवेली तालुकाध्यक्ष विजय जाचक, महिला हवेली तालुका उपाध्यक्ष सुनीता आढाव, महिला वाघोली अध्यक्षा स्नेहल कुलकर्णी, सरचिटणीस विद्या पाटील, महिला उपाध्यक्ष सोमाताई धर, नरेंद्र पाटील, ऋषिकेश कटके, जावेद शेख, प्रसाद कदम, सौरभ जगलपुरे, भाजप पदाधिकारी तसेच भारतीय जनता पार्टी वाघोली, युवा मोर्च, महिला आघाडी, क्रीडा आघाडी व सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी उपस्थित होते.