कॉर्नरस्टोन कंपनीशी सानियाचा करार

मुंबई – आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील कॉर्नरस्टोन कंपनीशी भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने करार केला आहे. असा करार करणारी सानिया भारताची पहिलीच महिला टेनिसपटू ठरली आहे.

क्रीडा क्षेत्रात गुणवत्ता व्यवस्थापन क्षेत्रातील अग्रगण्य अशी या कंपनीची जगात ओळख आहे. या करारांतर्गत सानिया या कंपनीची राजदूत म्हणून कार्यरत राहणार आहे. कंपनीतर्फे होणारे प्रमोशन, जाहिराती, व्यवस्थापन तसेच खेळाशी निगडीत सर्व कार्यक्रमांना सानियाची उपस्थिती राहणार आहे. तसेच देशातील टेनिसमधील नवी गुणवत्ता शोधण्यासाठी कंपनीने तयार केलेल्या योजनेचाही ती एक भाग असेल. या कंपनीच्या प्रसारासाठी तसेच वाढीसाठी ज्या योजना असतील त्यात सानियाचा सहभाग राहणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.