सानिया मिर्झा, अंकिता पहिल्याच फेरीत पराभवाने स्पर्धेबाहेर

टोक्यो ओलिम्पिकमध्ये भारताला पदक जिंकवून देण्यासाठी एक प्रबळ दावेदार असणारी टेनिस स्टार सानिया मिर्झा ही अंकिता रैनासोबत मिळून महिला डबल्सच्या पहिल्याच फेरीत पराभूत झाली आहे.

भारताच्या या जोडीला टेनिस खेळाच्या महिला डबल्समध्ये युक्रेनच्या नादीया आणि ल्युएडमायला भगिनीच्या जोडीने दारुण पराभूत केले.

सानिया आणि अंकिता यांनी सामन्याची सुरुवात जोरदार केली. दोघींनी पहिला सेट 6-0 च्या फरकाने जिंकला. पण त्यानंतर पुढील दोन सेट गमावले.

पहिला सेट जिंकणारी ही जोडी दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये 6-7(0) 8-10 च्या फरकाने पराभूत झाली. ज्यामुळे महिला डबल्समधील पहिल्या फेरीतील सामना 6-0, 6-7(0), 8-10 च्या फरकाने भारताच्या हातातून गेला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.