पिंपरी (प्रतिनिधी) – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात मंगळवारी (दि. 11) 20 करोनाबाधित रुग्णांची भर पडली. तर, 2 करोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले.
करोनाबाधितांमध्ये 7 महिला आणि 13 पुरुष आहेत. पिंपळे गुरव, काळेवाडी, हिंजवडी, चिंचवड, थेरगाव, पिंपळे निलख, राजगुरुनगर, नवी सांगवी, म्हाळुंगे, जुनी सांगवी, पिंपळे सौदागर आणि पुण्यातील ताडीवाला रस्ता (पुणे), गोखलेनगर, सदाशिव पेठ येथील रुग्णांचा त्यामध्ये समावेश आहे.
कासारसाई (ता. मुळशी) आणि जांबुत (ता. शिरूर) येथील अनुक्रमे 40 आणि 52 वर्षीय पुरुष करोनामुक्त झाले. त्यामुळे त्यांना आज घरी सोडले. रुग्णालयात आत्तापर्यंत एकूण 619 जणांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यातील उपचार सुरू असलेल्या 55 जणांपैकी 32 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आत्तापर्यंत 231 जणांना उपचार करून घरी सोडले आहे. एकूण 65 जणांचा मृत्यू झाला आहे.