पिंपरी (प्रतिनिधी) – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात बुधवारी (दि. 29) नव्याने 10 करोनाबाधित रुग्ण आढळले. तर, दोघांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. करोना बाधित रुग्ण हे सासवड, औंध, आळंदी, काळेवाडी, चाकण, वाकड, चिंचवड, औंध, हिंजवडी येथील आहेत. त्यामध्ये 5 पुरुष आणि 5 महिला रुग्णांचा समावेश आहे.
काळेवाडी येथील 41 वर्षीय पुरुष आणि बोपोडी येथील 37 वर्षीय महिला यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. करोनामुळे जिल्हा रुग्णालयात आत्तापर्यंत एकूण 51 जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपळे गुरव येथील 45 वर्षीय पुरुषाला आज “डिस्चार्ज’ देण्यात आला.
पिंपरी-चिंचवडमधील 3 आणि पुणे ग्रामीण येथील एक करोना संशयित रुग्णाला आज उपचारासाठी दाखल करून घेतले. रुग्णालयात सध्या 49 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 22 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, एकूण 155 जणांना उपचार करून घरी सोडले आहे.