पिंपरी (प्रतिनिधी) – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात शनिवारी (दि. 30) आणखी 12 जणांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पुणे, बोरी शिरोली (ता. जुन्नर), बोपोडी, वाकड, जुनी सांगवी, पाषाण, शिरुर आदी भागातील हे रुग्ण आहेत.
बोरी शिरोली येथील एकाच कुटुंबातील दोघांना करोनाची लागण झाली आहे. 60 वर्षीय महिला आणि 41 वर्षीय पुरुषाचा त्यामध्ये समावेश आहे. त्याशिवाय, पुणे-गणेशपेठ येथील एकाच कुटुंबातील तिघांच्या करोना चाचणीचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. एक तरुण आणि दोन महिलांचा त्यामध्ये समावेश आहे. बोपोडी, वाकड, पाषाण, कात्रज, शिरूर येथील प्रत्येकी एका पुरुषाला करोनाची लागण झाली आहे. त्यातील तिघे तरुण आहेत. जुनी सांगवी येथील एक तरुण आणि एका महिलेचा करोना चाचणीचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे.