सांगलीचा विळखा वाढला; 2 डॉक्टर होम क्वारंटाइनमध्ये

मिरजमध्ये धक्कादायक प्रकार समोर

सांगली – सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परदेशात जाऊन आलेल्या डॉक्टरांनी आपला दवाखाना सुरू ठेवून प्रॅक्टिस केली आहे. मिरजमधील श्रीनिवास हॉस्पिटल आणि सोमशेखर हॉस्पिटलवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे.

सांगली महापालिकेने मिरजेतील श्रीनिवास हॉस्पिटल आणि सोमशेखर हॉस्पिटलवर छापा घालून हे दोन्ही दवाखाने सील केले आहेत. डॉ. जी.ए.श्रीनिवास आणि डॉ. सोमशेखर याना होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे.

वास्तविक पाहता या डॉक्टरांनी परदेशातून आल्यानंतर प्रशासनाला सांगणे गरजेचे होते, आणि त्याहून ही धक्कादायक बाब म्हणजे, दवाखाना सुरू ठेवून अन्य रुग्णाच्या आरोग्य बरोबर एकप्रकारे धोकाच त्यांनी केला. त्यामुळे त्याच्यावर कारवाई केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.