Sangli News : सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एक मोठी कारवाई (Sangli News) करत आंतरराज्यीय रेकॉर्डवरील मोटारसायकल चोराला अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल ९ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून एकूण ५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव रणजित श्रीरंग लोखंडे (वय २४, रा. मल्हारवाडी, मंगसुळी, ता. कागवाड, जि. बेळगाव) असे आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २३ मे २०२६ रोजी सांगली (Sangli News) शहरात पेट्रोलिंग करताना पथकाला माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी रणजित लोखंडे याने चोरलेल्या मोटारसायकली वसंतदादा मार्केट परिसरातील महेश कबाडे यांच्या दुकानामागे लपवून ठेवल्या असून तो आज त्यातील मोटारसायकली विक्रीसाठी घेऊन जाणार आहे. पथकाने तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. संशयित एक मोटारसायकल घेऊन जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला पकडले. चौकशीत त्याने आपले नाव रणजित लोखंडे असल्याचे सांगितले. त्याने मिरज ग्रामीण, मिरज शहर, एमआयडीसी कुपवाड, कागवाड, कुडची, चिंचली तसेच कर्नाटक राज्यातून मोटारसायकली चोरून त्या सांगलीत आणून विकत होता,अशी कबुली त्याने दिली. Sangli News त्याच्याकडून एकूण ९ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून एकूण ५,३०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तर मोटारसायकल चोरीचे ७ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. या कारवाईत (Sangli News) विश्रामबाग, मिरज शहर, एमआयडीसी कुपवाड, मिरज ग्रामीण आणि कागवाड पोलीस ठाण्यांतील एकूण ७ गुन्हे उघड झाले आहेत. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकाने केली आहे.