सांगली : जिल्ह्यात आज 278 नवीन कोरोना रूग्णांचे निदान

कोरोना मुक्त 91 तर  6 जणांचा मृत्यू

शिराळा (प्रतिनिधी) – सांगली जिल्ह्यात आज मनपा क्षेत्रात 210 नवीन रुग्ण, शहरी मध्ये 13 रुग्ण, ग्रामीण भागात 55 रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्याची रुग्णसंख्या 3750 वर पोहोचली. आज अखेर बरे झालेले रुग्ण संख्या 1579 आहे. उपचारा खाली 1919 रुग्ण आहेत. जिल्ह्यातील 113 रुग्णांचा आज अखेर मृत्यू झाला आहे.

मनपा क्षेत्रातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. आजअखेरची ग्रामीण भागातील रुग्णसंख्या 1236, शहरी भागातील 262, मनपा क्षेत्रातील 2252 अशी आहे.  आज आरटीपीसी टेस्ट 670 घेण्यात आल्या, पैकी 217 रुग्ण पॉझिटिव्ह आले.  427 एंटीजन टेस्ट पैकी 63 रुग्ण पॉझिटिव्ह आले. तालुकानिहाय आजची पॉझिटिव्ह रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. जत 1, कवठेमहांकाळ 25, खानापूर 9,मिरज 13,प् लुस 2 ,शिराळा 7,तासगाव 9,वाळवा 2,सांगली 138,मिरज 72, अशी आहे

आज अखेर ग्रामीण भागात 42 मृत्यू झाले, शहरी भागात 8 मृत्यू, सांगली 32, मिरज 29, कुपवाड 2, असे आहेत. आजच्या 6 मृतांमध्ये आष्ट येथील 80 वर्षांचा पुरुष, मिरज येथील 62 वर्षांचा पुरुष, बोरगाव येथील 90 वर्षांचा पुरुष, हनुमाननगर येथील 55 वर्षांची महिला, सांगली येथील 46 वर्षांची महिला, कुपवाड येथील 55 वर्षांची महिला असा समावेश आहे. पॉझिटिव्ह पैकी पैकी ऑक्सिजनवर 19, व्हेंटिलेटरवर 15, असे आहेत

आज अखेर तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आटपाडी 145,जत 185, कडेगाव 76, कवठेमहांकाळ 148, खानापूर 69, मिरज 281, पलूस 137,शिराळा 203,तासगाव 102,वाळवा 152, मनपा 2252 अशी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.