मुंबई: छत्रपती वंशजाचा वादामुळे संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानच्यावतीने उद्या सांगली जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ गुरूवारी सातारा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान आता सांगलीत देखील बंद पाळण्यात येणार आहे.
यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “छान. आनंद आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना केली… याचा निषेध महणून सांगली बंदची हाक दिली असती…तर महाराष्ट्राला आनंद झाला असता. ठीक आहे. चालायचचं. आपल्या विषयी आदर आहे. राहील.”असे राऊत म्हणाले.