सांगलीचे मुख्य शासकीय ध्वजारोहन जयंत पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार

 
 शिराळा प्रतिनिधी : भारतीय स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिनी शनिवार, दिनांक 15 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 9.05 वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणावर होणार आहे. ही माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
या समारंभास खासदार, आमदार, नगरसेवक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, नागरिक, महिला, स्वातंत्र्य सैनिक, दलित मित्र, सन्मानीत व्यक्ती, सर्व शासकीय कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी, शिक्षक इत्यादीनी ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभागस आग्रहाने व वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. विजयनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणावर दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण होणार आहे. या दिवशी सकाळी 8.35 ते 9.35 या वेळेत इतर कोणत्याही संस्थेने, शासकीय, निमशासकीय कार्यालयाने ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करू नये.
एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ या दिवशी सकाळी 8.35 च्या पूर्वी किंवा 9.35 च्या नंतर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमास सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळावेत तसेच प्रत्येकाने चेहऱ्यावर मास्क परिधान करणे अनिवार्य आहे. ध्वजारोहणाचा समारंभ सुरु होण्यापूर्वी 15 मिनिटे आसनस्थ व्हावे व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही बॅग सोबत आणू नये, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.