जिल्ह्यात रुग्णसंख्येत चढ-उतार सुरूच आहे. मंगळवारी जिल्ह्यात नव्या 712 रुग्णांची भर पडली आहे. त्यात संगमनेर तालुक्यात सर्वाधिक 235 रुग्ण आढळून आले आहेत. त्या पाठोपाठ अकोले तालुक्यात ही नव्या रुग्णांनी शंभरी पार केली आहे. या तालुक्यात चोवीस तासांत 102 रुग्ण वाढले आहेत. तर नगर शहरात अवघे 14 रुग्ण आढळून आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात करोनामुळे 6 हजार 469 रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज 556 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 06 हजार 688 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.47 टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 712 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 4 हजार 752 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 123, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 246 आणि अँटिजेन चाचणीत 343 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 1, अकोले 17, जामखेड 2, कर्जत 4, नगर ग्रामीण 2, पारनेर 19, पाथर्डी 3, संगमनेर 66, शेवगाव 1, श्रीगोंदा 6 आणि
इतर जिल्हा 2 अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 5, अकोले 18, कर्जत 5, कोपरगाव 5, नगर ग्रामीण 13, नेवासा 19, पारनेर 8, पाथर्डी 2, राहाता 32, राहुरी 6, संगमनेर 111, शेवगाव 4, श्रीगोंदा 11, श्रीरामपूर 6 आणि इतर जिल्हा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज 343 जण बाधित आढळून आले. मनपा 8, अकोले 67, जामखेड 8, कर्जत 36, कोपरगाव 2, नगर ग्रामीण 6, नेवासा 16, पारनेर 46, पाथर्डी 4, राहाता 11, राहुरी 10, संगमनेर 58, शेवगाव 2, श्रीगोंदा 57, श्रीरामपूर 3 आणि इतर जिल्हा 9 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 10, अकोले 50, जामखेड 5, कर्जत 49, कोपरगाव 21, नगर ग्रामीण 44, नेवासा 15, पारनेर 35, पाथर्डी 37, राहाता 36, राहुरी 24, संगमनेर 122, शेवगाव 63, श्रीगोंदा 20, श्रीरामपूर 15, कॅन्टोन्मेंट बोर्ड 1 आणि इतर जिल्हा 9 अशा रुग्णांचा समावेश आहे.
==============
=====================