अलीगढ (उत्तर प्रदेश) : हिंदुत्ववादी विचारसरणीचे अध्वर्यु स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह टीका केल्याबद्दल मॅगेसेसे पुरस्कार प्राप्त मानवी हक्क कार्यकर्ते संदीप पांडे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.
अलीगढ मुस्लीम विद्यापीठात का कायद्याविरोधात रविवारी झालेल्या निदर्शना दरम्यान पांडे यांनी आक्षेपार्ह उद्गार काढले असल्याची तक्रार हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजीवकुमार यांनी नोंदवली. त्यानंतर सिव्हिल लाईन्स ठाण्यात 153 ए ( दंगल भडकावण्यासाठी प्रक्षोभक भाषण करणे) आणि 505 (1) ब (जमवाला गुन्हा करण्यासाठी उद्यक्त करणे) अशा कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला.
आपल्या भाषणात पांडे म्हणाले होते की, काही जण हिंदु मुस्लीमांध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. हा उद्योग ते ब्रिटीश राजवटीपासून करत आले आहेत. काही उजव्या संघटनांनी सुपारी देऊन बुरखेधारी गुंडांचा हल्ला जेएनयु आणि जामिया आणि अलीगढ विद्यापीठात घडवून आणला. ते खरे यात दोषी आहेत.
दरम्यान, प्रख्यात इतिहासकार इरफान हबीब यांनी उत्तर प्रदेश पोलिस नागरिकांच्या शांततेने निदर्शने करण्याचा हक्क हिरावून घेत दबाव तंत्राचा वापर करत असल्याच आरोप केला आहे. पोलिस पक्षपाती वागत असून असंतोष दडपूण टाकण्याच्या मागे लागले आहेत, असेही ते म्हणाले.