अभिनेता संदीप नहार आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण; धक्कादाय माहिती उघडकीस

मुंबई – अभिनेता संदीप नहारला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पोलिसांनी संदीप नहार यांची पत्नी आणि सासूविरोधात “एफआयआर’ दाखल केली आहे. संदीप नहार यांचे वडील विजय कुमार नहार यांनी संदीप यांची पत्नी कांचन आणि सासू वीणू यांच्याविरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार हे प्रकरण पोलिसांनी दाखल करून घेतले आहे. मात्र या संदर्भात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच संदीप नहार यांनी रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले होते. आत्महत्येपूर्वी फेसबूकवर केलेल्या व्हिडीओ मेसेजमध्ये संदीप यांनी पत्नी आणि सासूबद्दल तक्रार केली होती. वैवाहिक तंट्याला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचेही त्यांनी या मेसेजमध्ये म्हटले होते. पत्नी कांचन आणि सासू आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचेही त्यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले होते. बॉलिवूडमध्ये राजकारण होत असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.