“सत्यशोधक’मध्ये संदीप कुलकर्णी साकारतोय ज्योतिबांची भूमिका

चित्रपटांमध्ये ऐतिहासिक चित्रपटांचा जुन्या काळापासून सध्याच्या काळापर्यंत बोलबाला आहे. बॉलीवूडमध्येही ऐतिहासिक चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर चांगला गल्ला जमा करतात. या चित्रपटातून चांगला आदर्श निर्माण केला जातो. महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजपरिवर्तनासाठी सत्यशोधक समितीची स्थापना केली होती.

समाजलेखक, विचारवंत आणि थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. “सत्यशोधक’ असे या आगामी चित्रपटाचे नाव असणार आहे. या चित्रपटामध्ये ज्योतिबांची भूमिका संदीप कुलकर्णी साकारतोय, तर राजश्री देशपांडे सावित्रीबाई फुलेंची भूमिका साकारत आहे. क्रांतिकारी महात्मा फुलेंची जीवनयात्रा “सत्यशोधक’ या चित्रपटामध्ये पाहायला मिळेल. मोठ्या पडद्यावर हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.