Pune News : संदीप काळे यांना ‘हरित योद्धा’ पुरस्कार
Pune News : पुणे येथील एका विशेष सोहळ्यात प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप काळे यांना ‘हरित योद्धा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Pune News : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल पर्यावरणप्रेमी संदीप काळे यांना ‘हरित योद्धा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (Pune News)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय, भारत सरकार पुरस्कृत पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सह-सुविधा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Pune News : संदीप काळे यांना ‘हरित योद्धा’ पुरस्कार
आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते संदीप काळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. मिलिंद सरदेसाई, डॉ. प्रभा भोगावकर, डॉ. सुचेनिद्रा दत्ता आणि डॉ. दिगंबर मोकाट उपस्थित होते. (Pune News)





