…अन् बाळासाहेबांचे नाव घेताना संदीप देशपांडेंचा दाटून आला कंठ

मुंबई – मी विरप्पन गँगचा एन्काऊंटर करणार असे ट्वीट अनेक शिवसेना नेत्यांना झोंबले होते, आज मी आपल्यासमोर पुरावे घेऊन आलो आहे, फेरीवाल्यांकडून खंडणी उकळण्याचे काम शिवसेना करत आहे, असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. यावेळी ते शिवसेनेकडून फेरीवाल्यांना देण्यात आलेल्या पावत्याही दाखवल्या आहेत.

संदीप देशपांडे म्हणाले कि, शिवसेनेने हॉकर्स झोनची घोषणा केली होती. मात्र हॉकर्स झोन झाले नाही. आता शिवसेना फेरीवाल्यांकडून रीतसर पावती देवून खंडणी वसूल करते. या पावतीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. तसेच सार्वजनिक पथ आणि पद वापर करणाऱ्या फेरीवाल्यांचा होणारा उपद्रव कमी करण्यासाठी आणि कचरा निर्मुलनासाठी घेण्यात येणारा आकार, असा मजकूर या पावतीवर लिहिण्यात आला आहे.

तसेच, बाळासाहेबांचा, मुख्यमंत्र्यांचा, पर्यावरण मंत्र्यांचा फोटो पावतीवर लावून वसुली केली जात आहे. मला सगळ्यात जास्त दु:ख याचे वाटतंय की या पावतीवर बाळासाहेबांचा फोटो आहे, असे म्हणताना संदीप देशपांडेंचा कंठ दाटून आला.

खंडणीखोरांवर कारवाई व्हाल पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. अशा खंडणाखोरांच्या हातून मुंबई वाचवणे गरजेचे आहे. चंबळखोरांचे राज्य मुंबईत आले आहे की काय? असा प्रश्न मला कधीकधी पडतो, अशी टीकाही संदीप देशपांडे यांनी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.