कोल्हापूर भाजप जिल्हाध्यक्ष संदिप देसाईंचा घेतला तडकाफडकी राजीनामा

कोल्हापूर – भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांचा आज (रविवार) तडकाफडकी राजीनामा घेऊन त्यांच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी पक्षातर्फे देण्यात आलेल्या वाहनांसह, सवलती काढून घेण्यात आल्या.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी आजरा अर्बन बॅंकेचे व्यवसायासाठी घेतलेले कर्ज थकीत झाल्याने त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची नोटीस जारी करण्यात आली आहे. याबरोबरच न्यायालयातही बॅंकेने वसुलीबाबत फिर्याद दाखल केली आहे. तसेच संदिप देसाई यांनी पक्षनेतृत्वाच्या अपरोक्ष निवडणूकीत प्रचार यंत्रणेची जबाबदारी आणि प्रचार फलकाच्या संबंधात काही व्यवहार केल्याचेही पुढे आल्याचे समजते.

यावरुनच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गांभिर्याने दखल घेऊन संदिप देसाई यांचा त्वरीत राजीनामा घेऊन त्यांना पदमुक्त करण्याबाबत सुचना दिल्या. त्यानुसार आज दुपारी त्यांच्याकडून पदाचा राजीनामा घेऊन जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाकडून वापरासाठी दिलेले वाहन काढून घेण्यात आले.

त्यांची पक्षहितास बाधा येईल अशी प्रकरणे विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर बाहेर आल्यास पक्षावर त्याचा परिणाम होवू शकतो. म्हणून पक्षाच्यावतीने ही कारवाई केली असल्याचे समजते. जिल्हाध्यक्ष पदाची धुरा देण्यासाठी पक्षातील काही जेष्ठ नेत्यांबरोबरच भारतीय जनता युवा मोर्चाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची नावे चर्चेत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×