कराड : वाळू तस्करांकडून महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण 

कराड: बेलवडे गावच्या हद्दीत बेलवडे फाटा येथे महसूल विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना वाळू वाहतुक करणाऱ्या डंपर चालकाने मारहाण केल्याची घटना आज सकाळी अकराच्या सुमारास घडली. या मारहाणीत दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.
मकरंद साळुंखे व संतोष गुल्हाने असे मारहाण झालेल्या महसूल कर्मचाऱ्यांची नावे आहे. दरम्यान, मारहाण करुन डंपरचालक घटनास्थळावरून पळून गेला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बेलवडे गावाच्या हद्दीत महामार्गालगत वाळू वाहतूक करणारा डंपर वाळू खाली करत असताना कारमधून आलेल्या महसूल कर्मचाऱ्यांनी विचारपूस केली. त्यामुळे डंपर चालक व अन्य एकाने महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण करुन जखमी केले. यानंतर डंपरचालक घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेमुळे दुपारपासून जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने काम बंद आंदोलन सुरु केले आहे. सदर घटनेची फिर्याद तळबीड पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरु आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)