जागतिक व्याघ्र दिनानिम्मित्त प्रसिद्ध सॅण्ड आर्टिस्ट सुदर्शन पटनाईक यांच्या ‘खास’ शुभेच्छा

New Delhi: A White Tiger quenches its thirst in a water pond at its enclosure at National Zoological Park in New Delhi on Sunday. PTI Photo by Kamal Kishore (PTI7_16_2017_000156A)
भुवनेश्वर: आपल्या सॅण्ड आर्ट्स साठी जगभरामध्ये प्रसिद्ध असलेल्या सुदर्शन पटनाईक यांनी जागतिक व्याघ्र दिनानिमित्त वाघाचे एक खास शिल्प रेखाटले आहे. या शिल्पाबरोबरच नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वाघांसाठी “सेव्ह अझ” म्हणजेच आम्हाला वाचवा असा भावुक संदेश देखील लिहण्यात आला आहे.

दरम्यान जगभरामध्ये वाघांच्या प्रजाती लोप पावत चालल्या आहेत. बुद्धिवान,शक्तिशाली व चपळ असणाऱ्या या प्राण्याच्या मानवाने केलेल्या अनियंत्रित शिकारीमुळे जगभरात गेल्या काही दशकांमध्ये वाघांची संख्या झपाट्याने घटत आहे. २९ जुलै २०१० रोजी रशियातील सेंट पिटर्सबर्ग येथे झालेल्या व्याघ्र परिषदेमध्ये २९ जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले. जागतिक व्याघ्र दिनानिमित्त जगभरामधून आज शुभेच्छा देण्यात येत आहेत.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)