Mawra Hocane Wedding | ‘सनम तेरी कसम’ चित्रपटातील पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन लग्नबंधनात अडकली आहे. मागील अनेक दिवसांपासून मावराच्या अफेअरच्या व लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. अखेर तिने पाकिस्तानी अभिनेता अमीर गिलानीसोबत लग्न केले आहे. त्याच्या शाही लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
या जोडप्याने एका सुंदर सोहळ्यात ५ फेब्रुवारी २०२५ रोजी लग्न केले. मावरा व अमीर यांनी रोमँटिक पोज देत फोटो काढले. मावराने ‘आयुष्याच्या या धावपळीत, अखेर मी तुला शोधले आहे’, असं कॅप्शन देत हे फोटो शेअर केले आहे. मावरा व अमीरच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
मावराने या खास दिवसासाटी पेस्टल मिंट ब्लू टोनच्या लेहेंग्यात खूप सुंदर दिसत होती. तिच्या लेहेंग्यावर लाल व जांभळ्या रंगाची बॉर्डर डिझाईन होती. तिने मॅचिंग ब्लाऊज घातले होते आणि डोक्यावर ओढणी घेतली होती. तिने हिरव्या रंगाचे अगदी नाजूक दागिने घालून तिचा लूक पूर्ण केला होता. तर मावराचा पती अमीरने ऑलिव्ह हिरव्या रंगाचा पठाणी कुर्ता घातला होता.
View this post on Instagram
मावरा आणि अमीर यांनी यापूर्वी एकत्र काम केलं आहे. दोघेही ‘सबात’ आणि ‘नीम’ सारख्या लोकप्रिय टेलिव्हिजन ड्रामामध्ये एकत्र झळकले होते. त्यांनी कधीच त्याच्या नात्याची कबुली दिली नव्हती. मात्र ते रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात होतं. अखेर दोघांनीही लग्न करून या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
मावरा ही पाकिस्तानमधील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने हर्षवर्धन राणेबरोबर २०१६ मध्ये ‘सनम तेरी कसम’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिचा हा चित्रपट चांगलाच गाजला. आता ‘सनम तेरी कसम’ सिनेमा व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्ताने ७ फेब्रुवारीला पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे.
हेही वाचा: